Vidhan Sabha 2019 : शरद पवार आमचे आदर्श : चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे आमचे आदर्श आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे आमचे आदर्श आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले. 

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्य सहकारी बॅंकेच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा नोंदवला असला तरी त्यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. भाजप सुडाचे राजकारण करत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

अजित पवारांच्या डोळ्यांत पाणी, आमच्या कुटुंबात का गृहकलह करता : पवार

दरम्यान, अजित पवार हे स्पष्टवक्ते असून, ते आमचे मित्र आहेत. त्यांच्या पोटात एक व ओठात एक नसते, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.

माझ्यामुळे पवारसाहेबांची बदनामी झाली : अजित पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar is Our Ideal says Chandrakant Patil Maharashtra Vidhan Sabha 2019