

Sharad Pawar Politics: राज्यात सध्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा असं तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेचं समीकरण पूर्ण बदललंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली. त्यातला एक गट सत्तेत बसलाय तर एक विरोधात बसलाय.
अशातच पवारांच्या घरात नाही नाही म्हणून अजितदादांनी मोठं भगदाड पाडलं. जवळपास ४२ आमदारांच्या जोरावर अजितदादांनी सत्तेत भागीदारी मिळवली आणि पवारांना मोठा धक्का मिळाला. त्यानंतर आता ठाकरे आणि पवार गट आक्रमक झालेला दिसतोय. अशातच पवारांनी शिंदे गटाला मोठं खिंडार पाडलं.
शहापूरचे माजी आमदार आणि शिंदे गटात गेलेल्या पांडुरंग बरोरांनी आता एकनाथ शिंदेंना आणि शिवसेनेला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच पांडुरंग बरोरा हाती घड्याळ बांधून शरद पवारांच्या सोबत जाणार असल्याचं कळतंय.
सध्या दौलत दरोडा हे शहापूरमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पण त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पवारांनी आपला जुना शिलेदार परत बोलावलेला दिसतोय. पांडुरंग बरोरांच्या माध्यमातून शिंदेंना मोठा धक्का दिल्याचंही बोललं जातंय.
बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. तरी पांडुरंग बरोरा हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. २०१४ साली राष्ट्रवादीत असताना ते आमदार होते. २०१९ साली जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपासून ते राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या.
त्यानंतर अखेर ठाकरेंच्या उपस्थितीत बरोरांनी शिवसेनेत प्रवेश केला. पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा हेदेखील शहापूरमधून चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे बरोरांचं आणि राष्ट्रवादीचं तसं जुनं नातं आहे.
पवारांचा हा कट्टर समर्थक २०१९ साली नाराज होऊन शिवसेनेत गेला. त्यानंतर गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली तेव्हा ते एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. पण, शिवसेनेसोबत जाणं आपली चूक असल्याचं सांगत पांडुरंग बरोरांनी पुन्हा स्वघरी परतण्याची तयारी सुरु केली आहे.
अशातच येत्या विधानसभा-लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार, ठाकरे एक्शन मोडमध्ये आलेत. कारण, अजित पवार गटाला विधानसभेची शहापूरची जागा मिळाली तर ती जागा पाडण्यासाठी पवारांनी मोठा डाव आखल्याचं बोललं जातंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.