शरद पवार-अमित शहा भेट? राष्ट्रवादी म्हणतंय नाही तर, अमित शहांचं सूचक वक्तव्य

amit shaha sharad pawar
amit shaha sharad pawar

महाराष्ट्र : राज्याच्या राजकारणात सध्या सचिन वाझे प्रकरणावरुन उलथापालथ सुरु असतानाच राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण होईल, असं वृत्त समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये भेट घेतल्याची माहिती 'दैनिक भास्कर' या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. या भेटीवेळी शरद पवार यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल देखील सोबत असल्याचं या वृत्तात म्हटलं गेलंय. याबाबत एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने 'अंगकाढू' स्पष्टीकरण दिलं असताना दुसऱ्या बाजूला स्वत: अमित शहा यांनी सूचक असं विधान करत या गरमागरम चर्चेला फोडणी दिल्याचं दिसून येतंय. 'काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात' असं म्हणत अमित शहा यांनी या बातमीमागचं गूढ वाढवलं आहे तर अशा प्रकारची कसलीही भेट झाली नसल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. 

शरद पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत अहमदाबादमधून थेट मुंबईला होते मात्र ते कोणालाही भेटले नाहीयेत. त्यांची भेट झाल्याची बातमी येणं हे भाजपचं षड्यंत्र आहे. ही बातमी म्हणजे निव्वळ एक अफवा आहे, असं प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे. एकाबाजूला मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि सचिन वाझे तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचं परमबीर सिंह यांचं पत्र यामुळे राज्यात सध्या गरमागरम चर्चा आहे. दुसरीकडे कोरोनाचा वाढता उद्रेक राज्याची चिंता वाढवतो आहे. अशा पार्श्वभूमीवर तीन पक्षांच्या सरकारमध्ये सुसुत्रता नसल्याच्या चर्चा रंगत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीचं वृत्त खळबळजनक मानलं जात आहे. 

हेही वाचा - रेकॉर्ड ब्रेक वाढ! यंदाच्या वर्षात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये भाजपशी जवळीक असणाऱ्या काही मोठ्या उद्योगपतींची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती होती. गेल्या 26 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता एका फार्महाऊसवर ही भेट झाली होती, अशी माहिती होती. याचवेळी शरद पवार देखील अहमदाबादमध्येच होते, असं बोललं जात होतं. यावेळी या दोघांचीही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुप्तपणे भेट झाली असल्याचं वृत्त 'दैनिक भास्कर'ने दिलं आहे. प्रायव्हेट जेटने आलेल्या पवार आणि पटेल यांनी शांतीग्राममधील गेस्ट हाऊसमध्ये अमित शहांची भेट घेतली, असंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे. एकीकडे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकासआघाडीचं सरकार विविध कारणांनी अडचणीत असताना दुसऱ्या बाजूला याप्रकारची भेट होणं हे महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होणार असल्याची चिन्हे असल्याची चर्चा सध्या जोरदारपणे होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या भेटीबाबत स्पष्टपणे नकार देऊन अफवा असल्याचा निर्वाळा दिला असला तरीही अमित शहा यांचं यासंदर्भातील वक्तव्य सूचक मानलं जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com