

Sharad Pawar Voices Concern Over Narendra Modi Appeal
Esakal
PM Modi announcement may impact economy says Sharad Pawar इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना बचतीचं आवाहन केलंय. सोनं खरेदी वर्षभर करू नका, परदेश दौरे टाळा, इंधनाचा आवश्यक तेवढाच वापर करा, खाद्यतेल कमी खा, वर्क फ्रॉम होम करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. आता यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून कडाडून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींच्या घोषणेमुळे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणामाची भीती व्यक्त केलीय. मोदींच्या अचानक घोषणांमुळे गुंतवणूकदार, उद्योजकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण झाल्याचंही शरद पवार म्हणाले.