Sharad Pawar : 'अफवा थांबाव्यात म्हणून शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक' निवृत्तीच्या निर्णयावर मनसेची प्रतिक्रिया

Sharad Pawar News
Sharad Pawar Newsesakal

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा होता. या कार्यक्रमात पवारांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.

या घोषणेनंतर सभागृहात आक्रोश झाला. कार्यकर्ते भाऊक होऊन रडायला लागले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले. पुढे कार्यकर्त्यांनी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी धरणं धरलं.

Sharad Pawar News
'तेव्हा 'न्यू बेळगाव'चा प्रस्ताव मांडला होता'; कर्नाटक निवडणूकीपूर्वी शरद पवारांचा पुस्तकातून गौप्यस्फोट

त्यानंतर मात्र पवारांनी विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला. दोन ते तीन दिवसांनंतर ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यानंतर कुठे कार्यकर्ते शांत झाले. पवारांच्या या भूमिकेवर इतर राजकीय पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत.

Sharad Pawar News
Sharad Pawar Resign : शरद पवारांचे मानाचे स्थान कायम राहील; पृथ्वीराज चव्हाण

मनसेचीही प्रतिक्रिया आली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हा पवारांचा मास्टर स्ट्रोक असू शकतो, असं विधान केलं आहे. सध्या राज्याच्या राजकारणात ज्या अफवा सुरु आहेत त्या थांबवण्यासाठी ही खेळी तर नाही ना? असा संशय त्यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar News
Tukaram Munde: तुकाराम मुंडेंचा वनवास संपला, मिळाली 'या' खात्याची जबाबदारी

राजू पाटील प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून बोलायचं झालं तर त्यांचं वय किंवा त्यांना असलेला आजार याचा विचार करून हा निर्णय घेतला असावा. शरद पवार हे कामात वाघ आहेत, ते काम करतात. मात्र, कुठेतरी थांबायला हवं त्यामुळे ते थांबले असावेत'.

पुढे बोलतांना राजू पाटील म्हणाले की, सध्या ज्या हालचाली राज्यात सुरु होत्या. त्या अफवा असतील तर त्या कुठेतरी थांबाव्यात, त्यासाठी त्यांनी मास्टरस्ट्रोक खेळला असेल, अशी शक्यता असल्याचं पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com