कोरेगाव-भीमा प्रकरण : शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी पुढील तारीख मागणार

Sharad Pawar Testimony Koregaon Bhima Violence
Sharad Pawar Testimony Koregaon Bhima Violencee sakal

पुणे : गेल्या १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार (Koregaon Bhima Violence) घडला होता. याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना समन्स बजावण्यात आले होते. पण, ते साक्ष नोंदवण्यासाठी पुढील तारीख मागणार आहेत, अशी माहिती मिळतेय.

Sharad Pawar Testimony Koregaon Bhima Violence
चौकशी आयोग कोरेगाव भीमा परिसरात

शरद पवारांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणाबद्दल देखील माहिती दिली होती. त्यामुळे पवारांचा जबाब नोंदवण्यात यावा, अशी मागणी चौकशी आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पवारांना समन्स बजावण्यात आले. त्यांना २३ आणि २४ फेब्रुवारीला साक्ष नोंदवण्यास सांगितले होते. पण, पवार साक्ष नोंदवण्यासाठी पुढील तारीख मागणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी ते अर्ज करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. पवारांसोबतच पुण्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनाही समन्स बजावण्यात आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? -

पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोक १ जानेवारी २०१८ ला जमले होते. यावेळी हिंसाचार झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाल्यानंतर राज्य सरकारने एक आयोग नेमला. न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत. पवारांची साक्ष नोंदवली जावी, अशी मागणी वकील प्रदीप गावडे यांनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com