Sharad Pawar VS Ajit Pawar : सर्वात भारी कुणाची डायलॉगबाजी? राष्ट्रवादीच्या नेत्यांचे टॉप 10 डायलॉग

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जी भाषणबाजी केली त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.
Sharad Pawar VS Ajit Pawar maharashtra politics
Sharad Pawar VS Ajit Pawar maharashtra politicseakal

Sharad Pawar VS Ajit Pawar maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या घडामोडी आज घडल्या आहेत. कधीही विचार न केलेली गोष्ट दोन दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता. राज्यातील राजकारण नेमक्या कोणत्या वळणावर येऊन ठेपले आहे. असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोडून वेगळी चूल मांडलेल्या अजित पवारांची आजची बैठक खूप काही सांगून जाणारी होती.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाव, चिन्ह आणि त्यांच्याच फोटोचा वापर वेगळं जनमानस तयार करण्याचे काम अजित पवारांनी केले आहे.दुसरीकडे शरद पवार यांनी आपण पुन्हा एकदा पक्षबांधणीचे काम हाती घेतल्याचे म्हटले आहे. अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या राष्ट्रवादीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांना धक्का बसला होता. आज मुंबईमध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात त्यांनी एकमेकांवर सोडलेले वाग्बाण सुचक म्हणावी लागतील.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जी भाषणबाजी केली त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जयंत पाटील आणि धनंजय मुंढे यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापैकी त्या नेत्यांची डायलॉगबाजी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत.

१. शरद पवार - उषकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

- एकीकडे विठ्ठल, पांडुरंग म्हणायचं आणि दुसरीकडे वेगळं वागायचं...

पवारांनी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन करताना येत्या काळात आपल्याला आणखी एकजुटीनं तयार राहावे लागणार असल्याचे म्हटले आहे. मला एकीकडे विठ्ठल, पांडुरंग म्हणायचे आणि दुसरीकडे वेगळं वागायचं असा प्रकार सुरु झाला आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. तर येत्या काळात उषकाल होता होता काळरात्र झाली असे म्हणत कार्यकर्त्यांना लढण्यासाठी पुन्हा आवाहन केले आहे.

२. अजित पवार, - आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूकी का?

दादांनी तर आपले काका शरद पवार यांच्याविषयी व्यक्त केलेली खंत खूप काही सांगून जाणारी आहे. पवार साहेबांनी आपल्या वयाचा विचार करावा. आणि आराम करावा. आम्हाला मार्गदर्शन करावे. केंद्रामध्ये सोनिया गांधी ज्याप्रकारे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन करावे. काही गोष्टी कितीही सांगितल्या किंवा समजावून दिल्या तरी पटत नाही. आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूकी का? असं अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

३. रुपाली चाकणकर - आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे

अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देखील यावेळी शरद पवार गटातील नेत्यांना इशारा दिला आहे. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, आम्हाला बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे, अशा शब्दांत चाकणकरांनी थेट इशारा दिला आहे.

४. सुप्रिया सुळे - बापाला घरात थांबा असे सांगणाऱ्या पोरापेक्षा पोरगी बरी!

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना चोख उत्तर दिले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी रतन टाटा, अमिताभ बच्चन आणि सायरस पूनावासा यांच्या नावाचा उल्लेख करत, वय हा फक्त एक अंक असल्याचे प्रतिपादन केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की," जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते, तेव्हा वडीलांबरोबर लेक असते. आपल्या वडीलांना म्हणायचं तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद द्या, मग त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या."

५. धनंजय मुंढे - साहेब आपलं नातं विठ्ठल आणि वारकऱ्यांसारखं... आजचा निर्णय घेताना काय जाणीव होतोय, ते मला माहिती आहे.

अजित पवारांसोबत शपथ घेतलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलतांना सांगितलं की, अनेकजण आम्हांला म्हणतात, हिंदुत्वाबद्दल काय सांगाल. तर मी सांगतो. आमच्याकडे हिंदुत्वाचा विषय जेव्हा येतो तेव्हा आम्हांला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्य आठवतं. त्यामुळे आम्ही आमच्या विचारांवर ठाम आहोत.

पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, आमचे दैवत हे साहेब आहेत. माझ्या जीवनात हा प्रसंग दुसऱ्यांदा आला आहे. एवढी वर्षे आपण सगळ्यांनी साहेबांची सेवा केली आहे. विठ्ठल आणि वारकऱ्यांसारखं आपलं नातं आहे. आजचा निर्णय घेताना काय जाणीव होतोय, ते मला माहिती आहे. कारण यापूर्वी मी असा अनुभव घेतला आहे.

-------------

६. जयंत पाटील - 1. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है

2. कौन कहता है अस्मान में छेद नही हो सकता, एक पत्थर तबियत सें उछालो यारो

3. 'पाच वर्षे झाली सुट्टी घेतली नाही, आता सुट्टी द्या'!

जयंत पाटील यांनी आजच्या बैठकीमध्ये जी भूमिका मांडली त्यावरुन त्यांच्या मनातील व्यथा समोर आली आहे. पाटील यांनी याअगोदर राष्ट्रवादीतील गटबाजीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले होते.

पाटील म्हणाले, पहिल्यापासून साहेबांबरोबर आहे. बडवे असा शब्द वापरला जात आहे. खूप वाईट वाटते. मला पाच वर्षे पूर्ण झाली हे मला माहिती आहे तेव्हा आता मला कार्यमुक्त करा असे सांगितले. अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

७. डॉ. अमोल कोल्हे - 'श्रीकृष्णानं गोवर्धन करंगळीवर उचलला तसं साहेब आता...' खासदार कोल्हे भावूक

डॉ. कोल्हे यांनी मांडलेली भूमिका अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. यापूर्वी कोल्हे हे अजित पवारांच्या शपथ विधीच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. त्यावेळेपासून कोल्हे यांच्या भूमिकेविषयी विचारणा केली जात होती. त्यावरुन प्रश्नही विचारले जात होते. मात्र कोल्हे यांनी बाप हा बाप असतो. त्यांना सोडून जाता येणार नाही. अशा आशयाचे ट्विट केले होते. यामुळे वाय बी सेंटरमध्ये कोल्हे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

सभेमध्ये कोल्हे म्हणाले की, श्रीकृष्णाने गोवर्धन करंगळी वर उचलला ती भूमिका आता साहेब बजावत आहेत. त्यांची भूमिका महत्वाची आहे. कितीही अडचणींचे आभाळ आले तरीही आपण त्यांना सामोरं जायला तयार आहोत. आज पवार साहेब बरोबर उभे राहताना मला वाटते की, माझ्या बापानं स्वाभिमानानं अनेकांना कष्टानं चटणी भाकरी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com