शरद पवारांचा भाजपवर हल्ला; म्हणाले, काही संकट...

Man-made political crisis in the state
Man-made political crisis in the stateMan-made political crisis in the state

नागपूर : राजकारणात आणि सामाजिक जीवनात अनेक संकट येत असतात. यात काही नवीन नाही. मात्र, काही संकट नैसर्गिक व मानवनिर्मित असतात. सद्या राज्यात मानवनिर्मित राजकीय संकटे येत आहेत. भाजपचे थेट नाव घेता शरद पवार यांनी ही संकटे ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते निर्माण करीत असल्याचा आरोप केला. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संघटित शक्ती उभी करणे आवश्यक असल्याची गरज शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली. (Man-made political crisis in the state)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अमरावती विभागीय संवाद मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य संकटात कसं आणता येईल यासाठी प्रयत्न केला जात आहे. चौकश्या केल्या जात आहेत. अनेकांच्या मागे ईडी लावण्यात आली आहे. आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं. सतत काही ना काही करून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. काहीही करून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसला कसा अधिक त्रास देता येईल, असे प्रयत्न सुरू आहेत, असे नमूद करून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संघटित शक्ती उभी करण्याची गरज शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

Man-made political crisis in the state
डावे आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये वाद : रामनवमीवरून एकमेकांवर आरोप

एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) आंदोलन पुकारले आहे. कामगारांना दोष देता येणार नाही. संपकऱ्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. नेतृत्व चुकीचे असले की सैनिकही चुकीच्या मार्गाने जातात. एसटी कर्मचारी समाजाचा लहान घटक आहे. त्यांना भडकवण्याचे काम काही लोक करीत आहे. नेतृत्व चुकीच्या हाती होते. त्यामुळे त्याचे पुढे काय झाले हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात.

आंदोलकांना चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न

काही लोकांनी मुंबईत घडलेल्या घटनेच्या उल्लेख केला. त्याबद्दल विचारणाही केली. मात्र, यात कर्मचाऱ्यांची (ST Strike) काही चुकी नाही. त्यांना कोणीतरी भडकवण्याचे काम करीत आहे. चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करीत आहे. यातून राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

महागाई व बेरोजगारी हे देशापुढील महत्त्वाचे व गंभीर प्रश्न आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून राज्यातील सत्ता अस्थिर करण्यासाठी केंद्रातील सत्तेचा वापर केला जात आहे. हिंदू-मुस्लिम भेद निर्माण करून इतिहासाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. त्यावेळी तेथे सत्ता कुणाची होती, तिला पाठिंबा कुणाचा होता हे लपवून देशाच्या इतिहासाला सुरुंग लावण्याचे काम सद्या सुरू आहे, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com