Sharad Pawar in Pune : ''CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फाळणीचा इतिहास शिकवण्यासाठी सर्क्युलर'' शरद पवारांचा आक्षेप

sharad pawar in pune
sharad pawar in puneEsakal

पुणेः भारत-पाकिस्तान फाळणीचा इतिहास सीबीएसई बोर्डात शिकवण्यासाठी सर्क्युलर काढलं गेलं आहे. जो इतिहास क्लेषदायक आहे तो शिकवण्याचा घाट घातला जात आहे, हे चुकीचं असल्याचं आज शरद पवारांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, १९४७ साली आपण स्वतंत्र झालो. त्यानतंर काही दिवसांना देशात फाळणी झाली. अनेक लोक पाकिस्तानला गेले, काही तिकडूनही इकडे आले. देशात मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली. मात्र आज ती जखम पुन्हा ताजी केली जात आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने एक सर्क्युलर काढलं असून पाळणी नंतरच्या गोष्टींचं स्मरण करुन देण्यात येणार आहे.

sharad pawar in pune
Sharad Pawar in Pune : शरद पवारांची पुन्हा अजित पवार गटावर टीका; ''विकासासाठी गेल्याचं सांगतात, पण...''

अशा पद्धतीचं शिक्षण देण चुकीचं आहे. फाळणीच्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना हिंदू-मुस्लिम दंगे झाल्याचं सांगितलं जाणार आहे. फाळणीचा क्लेषदायक इतिहास शिकवणं योग्य नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. यावेळी शरद पवारांनी सीबीएसई आणि केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले.

sharad pawar in pune
FIFA Women's World Cup 2023 : स्पेनने इंग्लंडचा इतिहास रचला; फिफा महिला वर्ल्डकपला मिळाला नवा विजेता

शरद पवारांनी कांद्याच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला धारेवर धरलं. कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. जगातील मार्केट केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी बंद केलं. याला विकास म्हणत नाहीत. मागील सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातून अनेक कारखाने गुजरातला गेले आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी हुकल्या. सध्याचं महाराष्ट्र सरकार राज्याच्या हिताचे निर्णय घेत नाही, असंही शरद पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com