Ajit Pawar: शरद पवारांचा राजीनामा ते व्यावसायिकाच्या घरी झालेली गुप्त भेट! अजित पवारांनी केलेले राजकीय गौप्यस्फोट

अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्यावेळचा प्रसंग सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला.
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा कर्जतमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आज कर्जतमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. यावेळी अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्यावेळचा प्रसंग सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला.

काय म्हणाले अजित पवार?

"आम्ही १०-१२ जण देवगिरीवर बसलो होतो. भाजपसोबत जाण्याबाबत थेट शरद पवारांना सांगितलं तर काय होईल. या विचाराने मी ताईंना बोलवलं आणि सांगितले. ताईंनी वेळ मागितला आणि आम्ही देखील थांबलो. त्यानंतर मला घरी बोलवलं, आणि अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. असे शरद पवार साहेबांनी सांगितले. आम्हाला घरातल्या ४ लोकांना हे माहित होते."(Latest Marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar News : जयंत पाटलांनी तो शब्द पाळला असता तर.. ठाकरे सरकारच्या पडद्यामागच्या घडामोडींचा अजितदादांनी केला खुलासा

"त्या दिवशी पुस्तक प्रकाशनात त्यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले. नंतर काही लोकांना सांगितले की, वाय बी सेंट्रलला लोक पाहिजेत. राजीनामा देतो म्हणून सांगता मग हे कशाला? तिथे आव्हाड यांना सोडले तर इतर आमदार नव्हता, तेच तेच लोक होते. त्यानंतर आम्ही २ जुलै ला शपथ घेतली.."असं शरद पवार म्हणाले.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar: बारामतीसह 4 लोकसभा लढवणार! अजित पवारांचा गौप्यस्फोट, उबाठाच्या'या' जागांवर NCPचा डोळा

"२ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नाही तर, १५ जुलैला बोलवलं कशाला? आधी मंत्री या मग आमदार या असे सांगितले. निर्णय आवडला नाही तर बोलावले कशाला? मी फसवणूक म्हणणार नाही, पण गाफील का ठेवता?" असा थेट सवाल अजित पवार यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे. तसेच १२ ऑगस्टला मला एक उद्योगपतीने बोलावले. शरद पवार आणि जयंत पाटील असतील असा मला निरोप आला, म्हणून मी गेलो," असा खुलासा ही त्यांनी पुण्याच्या भेटीबाबत केला.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Supriya Sule: "मी गेटक्रश केलं..."; अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad Pawar Rules Out NCP Merger Confirms Both Nationalist Congress Parties Will Remain Separate in Maharashtra
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com