शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- शरद पवार आहेत विदर्भाच्या दौऱ्यावर

- पाहणी करण्यासाठी जात असताना झाला अपघात

- दुचाकीस्वार जखमी.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. त्यानंतर त्याच्यावर तातडीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून, पाहणीसाठी जात असताना हा अपघात झाला. शरद पवार यांच्या ताफ्यात दुचाकी आल्याने अचानक ब्रेक लावण्यात आला. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. पवार यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेतच जखमी दुचाकीस्वारावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. 

नव्या आघाडीसाठी जोरबैठका

दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी दुचाकीस्वाराच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित कार्यकर्त्यांनी दिली. 

छः महीने दिए हैं, बनाओ भाई सरकार!; अमित शहांचे उघड आव्हान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawars vehicle collided with a two wheeler