"माझी मुंबई, दुकानदारी अन् मी ठाकरेंचा ठरलेला कार्यक्रम" ; शिंदे गटाची खोचक टीका - Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : "माझी मुंबई, दुकानदारी अन् मी ठाकरेंचा ठरलेला कार्यक्रम" ; शिंदे गटाची खोचक टीका

औरंगाबाद : गद्दार विकता येतात, खोक्यातून विकत घेता येतात, पण शिवसैनिकांचे प्रेम विकता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिंदे गटावर टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला.

महाविकास आघाडीत सहभागी होऊन हिंदुत्वाचा त्याग केल्याचा आरोप आमच्यावर होत आहे. पण, आता ते उघडपणे शरद पवारांचा सल्ला घेतात, मग आमचं काय चुकलं. असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता.

दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. माझी मुंबई, मी आणि माझी दुकानदारी हा उद्धव ठाकरे यांचा ठरलेला कार्यक्रम आहे. तसेच संजय राऊत नेता आहेत की राऊत असे शिरसाट म्हणाले. 

हेही वाचा: Jayant Patil : पुढच्या वर्षी आम्ही फडणवीसांना सरप्राईज देणार; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांच्यामुळे नाही तर आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहोत. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपलं अस्तित्व टीकवण्यासाठी बाळासाहेबांना देखील लॉकरमध्ये बंद केले आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला शेतकऱ्याचे नुकसान झाले. मात्र उद्धव ठाकरे यांनी कधी बाहेर येऊन चौकशी केली नाही. त्यांचा ठरलेला कार्यक्रम असतो.

हेही वाचा: Raj Thackeray : "मतदान मिळत नाही तेव्हा..." ; राज ठाकरे यांनी व्यक्त केली खंत!

संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिरसाट म्हणाले, "संजय राऊत जेलमध्ये गेल्यापासून डोक्यावर पडले आहेत. आम्ही चाळीस दगडांनी सेतू बांधला होता. संजय राऊतांनी तो सेतू पाडला. त्या सेतूवरून सर्व चाललं होतं. याचा संजय राऊत यांना असूरी आनंद होत आहे. संजय राऊत जोकर आहे की नेता हे कळत नाही."

हेही वाचा: Cervical Cancer Vaccine : महिलांचा जीव मोलाचा! सीरमकडून पहिली मेड इन इंडिया 'HPV' लस लाँच