

Shiv Sena Leader Death beed
esakal
Maharashtra Agriculture News : दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांचा मुलगा आशुतोष शिंदे यांनी परळी ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.