शिंदे-ठाकरे गटाचे वकील भिडले! जोरदार शाब्दिक चकमक, आयोगाची मध्यस्थी - Shiv Sena Symbol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devadatt kamat and mahesh jethmalani

Shiv Sena Symbol : शिंदे-ठाकरे गटाचे वकील भिडले! जोरदार शाब्दिक चकमक, आयोगाची मध्यस्थी

Shiv Sena Symbol : शिवसेना पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले आहेत. या प्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्वाची सुनावणी झाली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी महत्वाचा युक्तिवाद केला. त्यांनी शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या घटनेची माहिती आयोगाला दिली आहे. 

शिवसेनेची घटना कायदेशीर नाही असे शिंदे गट कोणत्या आधारावर म्हणते, असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेतेपदाची शपथ घेतली होती तर ती कोणत्या आधारावर घेतली, असे सिब्बल म्हणाले. 

हेही वाचा: ShivSena Symbol: शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमची! ठाकरेंनी आयोगासमोर टाकला मोठा डाव

कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी प्रतिनिधी सभेवरुन ठाकरे गटाचे वकील कामत आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्यात चांगलाच वाद झाला. 

हेही वाचा: Shiv Sena Symbol Hearing : युक्तिवाद सुरु असतांना कामकाज काही काळासाठी थांबवलं

देवदत्त कामत जेव्हा युक्तिवाद करत होते. तेव्हा शिंदे गटाच्या वकीलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. महेश जेठमलानी यांनी कामत यांचा मुद्दा खोडला. त्यामुळे वातावरण गरम झाले. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक ऐवढी वाढली की केंद्रीय निवडणूक आयोगाला मध्यस्थी करावी लागली. निवडणूक आयोगाने दोघांना शांत केले. त्यानंतर पुन्हा युक्तिवाद सुरू झाला.

हेही वाचा: Shivsena Symbol : ठाकरे गटाच्या युक्तिवादामुळे शिंदे गट अडचणीत? कपिल सिब्बल यांनी बाहेर काढला हुकमी एक्का

या दोघांमध्ये प्रतिनिधी सभेचा मुद्दा होता. शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनेनुसार नाही. यावर ठाकरे गटाचे वकिल कामत यांनी आक्षेप घेतला. ज्या प्रकारे बाहेर लढाई सुरू आहे. तशी कायेदेशीर देखील लढाई सुरू आहे. 

हेही वाचा: Shivsena Symbol : शिंदेंचं कालचं भाषण आज अडचण ठरण्याची शक्यता; निवडणूक आयोगासमोर...