माझे 'काका' अभिनय क्षेत्रात होते म्हणून...; अजित पवारांच्या 'नटसम्राट' टीकेला अमोल कोल्हेंचे जोरदार प्रत्युत्तर

Amol Kolhe reply to Ajit Pawar: अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात 'एक्स'वर पोस्ट केली आहे.
Amol Kolhe reply to Ajit Pawar
Amol Kolhe reply to Ajit Pawaresakal

मुंबई- तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे असं म्हणत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना टोला लगावला होता. यावरुन अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात 'एक्स'वर पोस्ट केली आहे. (shirur loksabha election 2024 ncp leader Amol Kolhe reply to Ajit Pawar criticism )

अमोल कोल्हे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणालेत की, कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की! २००१ साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर..आणि योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो. ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर…

Amol Kolhe reply to Ajit Pawar
Ajit Pawar News : शिवतारेंनी कोणाकोणाचे फोन आले ते दाखवलं; बारामतीतील सभेत अजित पवार मनातल सगळंच बोलले

शिरुर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव यांच्यामध्ये लढत होत आहे. आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी मेळावा घेतला होता. यावेळी अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना टोला लगावला होता.

अमोल कोल्हे यांनी पाच वर्षांमध्ये किती जनसंपर्क ठेवला, किती लोकांना भेटले, ते इथल्या लोकांना उपलब्ध होते का? हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता हवेली आणि शिरुर मतदारसंघातील लोकांना ठरवायचं आहे ती त्यांना कार्यसम्राट खासदार हवा आहे की नटसम्राट खासदार, असा टोला अजित पवारांनी लगावला होता. यावर अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Amol Kolhe reply to Ajit Pawar
Baramati Loksabha: धमकावले असते तर बारामतीकर पाठीशी राहिलेच नसते; अजित पवार स्पष्टच बोलले

अमोल कोल्हे हे मला म्हणायचे की त्यांना राजीनामा द्यायचा आहे. माझं काम खासदारकीचं नाही. मला सिनेमात नट म्हणून काम करायचं आहे. मी कलावंत असून माझे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मला राजीनामा द्यायचा आहे. पण, मी त्यांना म्हणायचो लोकांनी तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिलं आहे. त्यामुळे थोडी कळ काढा. पुन्हा तुम्हाला उभे राहण्यासाठी आग्रह करणार नाही. पण, आता त्यांना काय झालंय माहिती नाही. त्यांनी पुन्हा जोर आणि बैठका सुरु केल्या आहेत, असं अजित पवार सभेत म्हणाले होते. (Latest Election News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com