Baramati Loksabha: धमकावले असते तर बारामतीकर पाठीशी राहिलेच नसते; अजित पवार स्पष्टच बोलले

पोलिस त्या बाबतची कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली|Deputy Chief Minister Ajit Pawar responded that the police will take action in this regard
Baramati Loksabha
Baramati Loksabhasakal

Baramati News: पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, संस्था चालविताना संस्थेच्या पध्दतीनेच चालवायची असते व राजकारण करताना राजकारणाच्याच पध्दतीने करायचे असते, जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसात तक्रार दाखल करावी, पोलिस त्या बाबतची कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

Baramati Loksabha
Ajit Pawar: पार्थ पवारांचा दारुण पराभव करणाऱ्या बारणेंच्या प्रचाराला अजित पवार!

बारामतीत आज भेटीगाठीच्या निमित्ताने अजित पवार दिवसभर आहेत, सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. सुपे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून दमबाजीला घाबरु नका असे जाहीर सभेतून सांगितले होते, त्या बाबत विचारता अजित पवार यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली.

विजय शिवतारे यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर काही भूमिका मांडली होती, त्याच वेळेस त्यांच्या भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती, त्या नुसार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही 11 एप्रिल रोजी होणा-या त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. आम्ही बोलतो तसे वागतो, बदलत नाही, त्या प्रमाणे आम्ही शब्दाला जागून आम्ही तिघेही तेथे जाणार आहोत.

Baramati Loksabha
Pravin Mane join Ajit Pawar group: निवडणुकीपुर्वी सुप्रिया सुळेंना धक्का! प्रवीण मानेंनी सोडली साथ, स्वत:च केलं स्पष्ट

एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाने काय करावे हे ज्याच्या त्याचा अधिकार आहे, राजकारणात अशा घटना घडत असतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार दिला आहे, त्या मुळे ते तो बजावतात.

संजय राऊत यांनी लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुध्द उध्दव ठाकरे आहे, असे नमूद केले आहे, या वर मिश्किलपणे हसत पत्रकारांनाच तुम्हाला तरी खरच अस वाटत का...असा प्रतिप्रश्न करत पवार म्हणाले एक वेळ नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशी ही लढाई आहे असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते, पण त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही, त्या मुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे असा सल्लाही अजित पवार यांनी संजय राऊत यांना दिला.

Baramati Loksabha
Ajit Pawar : भाजप आपला थोरला भाऊ : अजित पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com