संजय राऊत म्हणतात, आम्ही बिनधास्त आहोत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश ट्विट करत म्हटले आहे, की संघर्षाचा काळ कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संर्घषातूनच आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल. या ट्विटमुळे संजय राऊत हे सत्तास्थापनेविषयी आणखी आशादायी असल्याचे संकेत देत आहेत.

मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही बिनधास्त आहोत, असे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश ट्विट करत म्हटले आहे, की संघर्षाचा काळ कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संर्घषातूनच आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल. या ट्विटमुळे संजय राऊत हे सत्तास्थापनेविषयी आणखी आशादायी असल्याचे संकेत देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवारांचे बंड 

अजित पवार रात्रभर आमच्यासोबत होते, पण आमच्या नजरेशी नजर मिळवू शकले नाहीत. त्यांच्या मनात वाईट विचार होते म्हणूनच असं झालं. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच रात्रीच्या अंधारात वाईट कामे केली जातात,चोरी-डाका टाकला जातो, व्यभिचार होतो. यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पण अंधारात घेतली. दिवसा-ढवळ्या शपथ का घेतली नाही,' असा सवाल राऊतांनी यावेळी केला. पवारांचा या सर्व घडामोडींशी काहीही संबंध नाही. त्यांना याबाबत काहीही माहीत नव्हते. अजित पवार रात्रभर आमच्यासोबत होते. ते अचानक निघून गेले, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. कोणत्या तरी वकिलाकडे जातोय असे त्यांनी सांगितले, आता कळले की ते कोणत्या वकिलाकडे गेले होते, असेही राऊतांनी यावेळी सांगितले. 

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shisvena MP Sanjay Raut tweet about Ajit Pawar with BJP