

Omraje Nimbalkar
esakal
शिवसेना ठाकरे अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थिती अत्यंत कमी राहिली. केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित खासदारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. यामुळेच राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा वेगाने रंगू लागली आहे. ठाकरे गटातील तब्बल सहा खासदार दूर गेल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.