"व्वा! काय हा साहेबांचा..."; शिवसेनेची PM मोदींसह समर्थकांवर खोचक टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi and Sanjay Raut
"व्वा! काय हा साहेबांचा..."; शिवसेनेची PM मोदींवर खोचक टीका

"व्वा! काय हा साहेबांचा..."; शिवसेनेची PM मोदींवर खोचक टीका

sakal_logo
By
सुधीर काकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासीयांना संबोधित करताना एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार केंद्र सरकार तीन कृषी कायदे मागे घेणार आहेत. त्यानंतर देशभरातून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला यश आल्याचं बोललं जातं आहे. तर दुसरीकडे मात्र विरोधी पक्षासह काही लोकांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांना उशीरा शहाणपण सुचल्याचं सांगितलं. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा आज पंतप्रधान मोदी आणि समर्थकांवर खोचक टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांचं आंदोलन कधी थांबणार? आज बैठकीत रणनीती ठरणार

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधूम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या कालच्या निर्णयावर भाष्य करण्यात आलं आहे. शेतकरी लढले, शहीद झाले आणि अखेर जिंकले असं म्हणत शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. तर पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खालीस्थानी म्हटलं होतं, तर आता त्यांच्यापुढे पांढरं निशाण का फडकावलं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे पंतप्रधान मोदी यांच्या मागे न हटण्याच्या भूमिकेवरून देखील सामनामध्ये भाष्य करण्यात आलं असून, "मागे हटणार नाही असे सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला, पण आताही अंध भक्त बोलतील, काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!" असं म्हणत खोचक टीका केली आहे.

हेही वाचा: अखेर रामदास कदमांचा पत्ता कट; पक्षाकडून 'या' उमेदवाराला संधी

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी मागे घेणार असल्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आपण शेतकऱ्यांना कृषी कायदे समजावू शकलो नाही असं म्हणत त्य़ांनी हे कायदे मागे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या लढ्याला यश मिळाल्याचं बोललं जातंय. आंदोलनाला यश आलं असलं तरी, शेतकरी हे आंदोलन नेमकं कधी मागे घेणार याबद्दल कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याच पार्श्वभूमिवर आज पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक पार पडणार आहे.

loading image
go to top