दिपाली सय्यदचा बंडखोरांना राजकीय शहाणपणाचा सल्ला, आदरणीय शिंदेसाहेब...

शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार.
Deepali Sayed News
Deepali Sayed Newsesakal

शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार आणि फ्लोअर टेस्टसाठी हजर राहणार अशी माहिती त्यांनी स्वतः शिंदेंनी दिली. त्याच्या या भूमिकेनंतर आदरणीय शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये असे आवाहन शिवसेनेच्या महिला नेत्या दिपाली सय्यदने शिंदेंना दिले.(Deepali Sayed News)

Deepali Sayed News
Maharashtra Politics LIVE: राज्यपालांविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

राज्यात सध्या सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. आता शिवसेनेच्या महिला नेत्या दिपाली सय्यदने ट्विट करत बंडखोर आमदारांना राजकीय शहाणपणाचा सल्ला दिला आहे.(Shiv Sena News)

काय म्हणाली आहे ट्विटमध्ये?

माननीय शिवसेना आमदार महोदय, हिंदुत्वाच्या मुद्यावरून युती झाली तर पुढची साडेसात वर्ष सत्तेची मग शिवसेनेला मुख्यमंत्री पद त्यातअसणार का? बहुमतचाचणी करण्याआगोदर पक्षप्रमुखांशी बोलणार का? आदरणीय शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये. शिवसैनिकांची मेहनत वायाजाऊ नये. जय महाराष्ट्र

असे दिपाली सय्यदने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावरील राजकीय संकट लवकर टळू दे असं मागणं देवीकडे मागितलं. त्यानंतर त्यांनी उद्या मुंबईत येण्याबाबत वक्तव्य केले.

Deepali Sayed News
महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळात ममता बॅनर्जींची उडी; BJPवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणं मागितलं आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात. आता आम्ही उद्या सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्ट साठी जाणार आहोत आणि जी कोणतीही प्रक्रिया पार पाडायची असेल त्या पद्धतीची पूर्तता पार पाडण्यासाठी आम्ही उद्याच मुंबईत जाणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com