शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र मिळालं नाही; कोण काय म्हणाले? (Video)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

अखेर तिसरा मोठा पक्ष म्हणून, राष्ट्रवादीला राज्यपालांनी पाचारण केलं. या सगळ्या घडामोडींमध्ये कोणी पाठिंब्याचं पत्र दिलं नाही, हा विषय चर्चेला आलाय. यावर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहू.

मुंबई : शिवसेनेला काल सायंकाळपर्यंत सत्ता स्थापनेची मुदत होती. तत्पूर्वी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांना पाठिंब्याचं पत्र जाणं अपेक्षित होतं. राज्यपालांची भेट घेईपर्यंत, काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र शिवसेनेला मिळालं नाही. त्यामुळं शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी मुदतवाढ मागितली. पण, राज्यपालांनी ती नाकारली. अखेर तिसरा मोठा पक्ष म्हणून, राष्ट्रवादीला राज्यपालांनी पाचारण केलं.

'कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती'; राऊतांचे थेट लीलावतीतून ट्विट

या सगळ्या घडामोडींमध्ये कोणी पाठिंब्याचं पत्र दिलं नाही, हा विषय चर्चेला आलाय. यावर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहू.

शरद पवार : मला सगळ्यांत आधी काँग्रेसशी बोलावं लागेल.

अजित पवार : काँग्रेसकडून पत्र आलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीनं पत्र देऊन काही फरक पडणार होता. या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा होऊ शकली नाही. त्यांचे नेते जयपूर दिल्लीत होते. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. काँग्रेसशी आघाडी करून, आम्ही निवडणूक लढवली होती. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. 

सुप्रिया सुळे :  पाठिंब्याचं पत्र का मिळलं नाही हे माणिकराव ठाकरे यांना विचारा. (स्रोत : टीव्ही)

माणिकराव ठाकरे : दुपारी चार नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच सगळं काही स्पष्ट होईल.

काय आहे स्टॅटेजी?
अजित पवार यांच्या वक्तव्यानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना किमान समान कार्यक्रम राबविण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र कधीच काम न केल्यामुळे सत्ता स्थापनेपूर्वी ही सगळी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी काँग्रेस सर्वाधिक आग्रही असल्याचेही सांगण्यात आलंय. त्यामुळं किमान समान कार्यक्रम ठरल्यानंतरच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस, महाशिवआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांच्या भेटीसाठी शरद पवार लीलावतीत दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena did not get support letters from congress and ncp leaders reactions