esakal | संजय राऊतांच्या भेटीसाठी शरद पवार लीलावतीत दाखल

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar recahed Leelavati hospital to meet Sanjay Raut

सत्तास्थापनेचा तिढा वाढत जात असताना राऊतांनी अनेकदा शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले होते. पवार व राऊत यांचे वैयक्तिक संबंध आहेत. यामुळे आज पवार नातू रोहितसह संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास गेले आहेत.

संजय राऊतांच्या भेटीसाठी शरद पवार लीलावतीत दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मागील अनेक दिवस राजकीय घाडामोडींसाठी चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल (ता. 11) अँजिओग्राफी झाली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रूग्णालयाकडे रवाना झाले आहेत. काल दुपारी चारच्या दरम्यान राऊतांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

सत्तास्थापनेचा तिढा वाढत जात असताना राऊतांनी अनेकदा शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले होते. पवार व राऊत यांचे वैयक्तिक संबंध आहेत. यामुळे आज पवार नातू रोहितसह संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास गेले आहेत. राऊतांना काल लीलावतीत दाखल करण्यात आल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर दोन ब्लॉकेज आढळल्याने लगेचच अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांनी राऊतांना दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 

'कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती'; राऊतांचे थेट लीलावतीतून ट्विट

राज्यापाल भगतसिंह कोशियारी यांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली मुदत काल (ता. 11) संध्याकाळी साडेसातला संपली. त्यापूर्वीच साधारण दुपारी चारच्या दरम्यान संजय राऊत यांना लीलावती रूग्णालयात रूटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठीही राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली होती. पण, काही कारणाने शिवसेने बहुमत सिद्ध करू शकली नाही. आज (ता. 12) संध्याकाळी साडेआठपर्यंत राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिली आहे.  

संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी

राऊतांनी आजही केले ट्विट
काल अँजिओग्राफी झालेल्या राऊतांनी आज तब्येत बरी नसतानाही ट्विट केले आहे. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती।' - बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे...' असे ट्विट केले आहे. शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नसले तरी आम्ही हार मानणार नाही, असाच संदेश तर राऊतांना या ट्विटमधून द्यायचा नसेला ना...