सेनेचा राष्ट्रवादीला धक्का; पदाधिकाऱ्यांसह सावंतांची घरवापसी

तोंडली सरपंचांसह प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत
चिपळूण ः शिवसेनेत प्रवेश करताना सरपंच सावंत.
चिपळूण ः शिवसेनेत प्रवेश करताना सरपंच सावंत. ESakal

चिपळूण : गावच्या विकासाच्यादृष्टीने आणि आपल्या गावातील सुपुत्र शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत (Sandeep Savant)याना पाठबळ देण्यासाठी शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव (Bhasker Jadhav )यांच्यावर विश्वास व्यक्त करत तोंडली सरपंच मेघजी सावंत (Meghaji Savant)यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी आज ता. २९ रोजी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सरपंच आणि पदाधिकारी यांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जात आहे.

चिपळूण ः शिवसेनेत प्रवेश करताना सरपंच सावंत.
बिगुल वाजलं; भाजप विरुद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत चुरस

गावाच्या विकासासाठी आणि गावाचे सुपुत्र शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांना खंबीर पाठबळ देण्यासाठी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला आणि आज आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना प्रवक्ते भास्कर जाधव यांच्यासह तालुकाप्रमुख संदीप सावंत, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ सावंत, महेश सावंत, अजय सावंत, प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला.

जाधव यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेले

गुहागर मतदारसंघातील मात्र चिपळूण तालुक्यात समाविष्ट असणाऱ्या तोंडली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सरपंच विराजमान होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरपंच उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर निवड करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. या विभागात सरपंच मेघजी सावंत याची राजकीय ताकद चांगली आहे. राष्ट्रवादीचा खंबीर शिलेदार म्हणून त्यांची ओळख होती. पूर्वी शिवसेनेचे काम करणारे मेघजी सावंत आमदार जाधव यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेले; मात्र आमदार जाधव शिवसेनेत आल्यानंतर मेघजी सावंत राष्ट्रवादीत थांबले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com