संजय राऊत यांच्या नव्या ट्विटने राजकीय खळबळ !

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट करून भाजपवर निशाना साधला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणावर टीका कोली आहे.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक नवीन ट्विट केले आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारे हे ट्विट आहे. त्यांन हे ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी या ट्विटव्दारे भाजपच्या सध्याच्या एककल्ली आणि हुकूमशाही धोरणावर कडाडून टीका केली आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोदी सरकारने सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (सिटीझनशिप अॅमेडमेंट अॅक्ट) बदल केले आहेत. तसेच राष्ट्रीय नोंदणी पुस्तिका (एनआरसी) कायदा केला आहे. यावरून देशभरात नागरिकांची आंदाेलने सुरु आहेत. या आंदोलनाची मोठी झळ ईशान्य़ेकडील राज्यांना पोहचत आहे. यामध्ये मोठी जिवीतहानी व वित्तहानी होत आहे. या आंदोलनात पश्चिम बंगालमध्ये आजपर्यंत 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ईशान्य़ेकडील राज्यांमध्ये देखील मोठी जिवीतहानी होत आहे. महाराष्ट्रात देखील या आंदाेलनाचे लोण पोहचले आहे. महाराष्ट्रात नागरिक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत या कायद्यांना विरोध करत आहे.

- 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

मोदी सरकारने केलेल्या या कायद्यांना नागरिकांचा मोठा विरोध आहे. तरी देखील सरकारने या देशातील नागरिकांना विचारात न घेता हा कायदा केला आहे. यावरून काॅंग्रेससह सर्वच पक्षांनी या कायद्याला कडाडून विरोध केला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील सद्यस्थितीवर भाष्य करणारे ट्विट आज केले आहे.

 CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!

दरम्यान, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राहत इंदोरी यांचा एक प्रसिद्ध शेर शेअर केला आहे. सभी का खून है शामिल यहाॅं की मिट्टी में! किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है! असा तो शेर आहे. या शेअरव्दारे राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट करून भाजपवर निशाना साधला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणावर टीका कोली आहे. या ट्विटवरून भाजप-सेना संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv sena leader sanjay raut new tweet attacks bjp