

Both Shiv Senas should come together again - MP Omraje Nimbalkar.
Sakal
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या मनोमीलनाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच, आता शिवसेनेच्या एकत्रीकरणाबाबतही अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या एका बड्या खासदाराने चक्क "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत" अशी जाहीर इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेनेच्या विलीनीकरणावर आणि पुनर्मीलनावर थेट भाष्य केले आहे.