

Supreme Court hearing in the Shiv Sena dispute over the disqualification of Eknath Shinde and other MLAs
esakal
शिवसेना पक्षातील सत्तासंघर्षाशी संबंधित प्रकरणावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी उद्धव ठाकरे गटाला महत्त्वाचा सवाल केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवलेले नसताना, तसेच शिंदे नव्या निवडणुकीत पुन्हा निवडून आलेले असताना, सर्वोच्च न्यायालय त्यांना थेट अपात्र ठरवू शकते का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.