Kapil Sibal Defends Uddhav Thackeray in Supreme Court
esakal
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील वादावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडत असून, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. याचबरोबर, एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे.