
shivsena party and symbol supreme court hearing
शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्य पक्षाच्या वतीने लवकर सुनावणीची विनंती केली. ठाकरे यांचे प्रतिनिधित्व करणारे कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहेत आणि त्यापूर्वीच या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे, कारण अनेक महिने आधीच उलटून गेले आहेत.