
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल केलेल्या विधानावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटात दोन मर्सिडिज दिल्या की एक पद मिळायचं असं विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं होतं. या विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गोऱ्हेंना आव्हान देत गाड्यांच्या पावत्या दाखवा असं म्हटलं होतं. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केलाय. नीलम गोऱ्हे यांनी नाक घासून माफी मागितली तरी त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं अंधारे यांनी सांगितलं.