
शिवसेना-वंचितचं ठरलं! मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार, पण...
मुंबईः ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी झालेली आहे.
हेही वाचा: Omicron XBB: भारतात वेगाने पसरतोय कोरोनाचा 'हा' व्हेरियंट, जाणून घ्या किती धोकादायक?
मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा वंचितला सोबत घेण्यासाठी विरोध असल्याचं सांगितलं जातंय. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली ते म्हणाले, "मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचीत बहुजन विकास अघाडी ८३ जागा लढण्याची तयारी केली होती,
मात्र शिवसेना जेवढ्या जागा सोडेल तेवढ्या जागा लढवू अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते म्हणाले येणाऱ्या महापालिका निवडणुक शिवसेनेसोबत लढण्याचा निर्णय झालाय, मात्र शिवसेनेचा हा प्रयत्न आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाना देखील सोबत घेतलं पाहिजे त्यावर आम्ही म्हणालो आमचा त्याला विरोध नाही.
हेही वाचा: JP Nadda: नड्डा 'बाळासाहेब ठाकरे' नाव विसरले; अंबादास दानवेंचा सुचक इशारा
हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
मात्र मला सुत्रांकडून समजत आहे की या युतीला राष्ट्रवादीचा उघड विरोध आहे. तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे. असं मला कळालं आहे. या पक्षाना वाटत नाही की गरीब मराठा सत्तेत यावा, म्हणून वंचितला विरोध आहे. असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.