इस्लाम धर्म हाच देशाचा खरा शत्रू; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी भिडे

इस्लाम धर्म हाच देशाचा खरा शत्रू; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता अश्याच एका वक्तव्याने संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. इस्लाम धर्म हाच खरा देशाचा शत्रू आहे असं म्हणत भिडे गुरुजींनी हिंदु-मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले. पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. (Shivapratishtan Leader Sambhaji Bhide's statement on muslim community)

भिडे म्हणाले, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण पाळत आहोत. त्यामध्ये हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आव्हान दडलेलं आहे. संभाजी महाराज औरंगजेब नाहीय. पण औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश गाव वस्त्यांमधील मुस्लिमांच्या रुपाने आजही शिल्लक आहे.परंतु संभाजी महाराजांची जी आग होती ज्यात त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाचा आणि धर्माचा अभिमान न सोडता, न झुकता, न मागे सरकाता, न शरण जाता त्यांनी देश देवाचा अभिमान मनात धरुन मरण पत्करलं परंतु इस्लाम स्वीकारला नाही. आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे.” भिडे गुरुजींनी हिंदु-मुस्लीम समाजात तेढ निर्माण होणारं वक्तव्य करत आता नव्या वादाला तोंड फोडलं.

संभाजी भिडे यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेतले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधले.