अखेर आज महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 November 2019

शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी त्यांची बैठक बोलावून शेतकऱ्यांना पीकविमा कर्जाचे पैसे मिळावेत, रखडलेल्या प्रकल्पांना निधी मिळावा, आदी प्रमुख मुद्‌द्‌यांचा या निवेदनामध्ये समावेश असणार आहे.

मुंबई : सत्ता स्थापण्यासाठी एकत्रित आलेले शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस पक्ष प्रथमच राज्याच्या प्रश्‍नांवर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची शनिवारी (ता.15) एकत्र भेट घेणार असून, त्यांना संयुक्त निवेदन देणार आहेत. आज सायंकाळी साडेचार वाजता प्रमुख नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

फडणवीस यांनी अद्याप वर्षा बंगला सोडला नाही, कारण...

शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी त्यांची बैठक बोलावून शेतकऱ्यांना पीकविमा कर्जाचे पैसे मिळावेत, रखडलेल्या प्रकल्पांना निधी मिळावा, आदी प्रमुख मुद्‌द्‌यांचा या निवेदनामध्ये समावेश असणार आहे.

शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...

त्याचबरोबर राज्यात सरकार नसल्याने प्रशासकीय कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडथळे येत असून, जनसामान्यांच्या आवश्‍यकतेच्या योजनांमध्ये अडथळे येणार नाही, याची काळजी घेतली जावी, अशी मागणी केली जाणार आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, नवाब मलिक आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचा या शिष्टमंडळात समावेश असणार आहे. 

'105 किंकाळ्या' आणि वेड्यांचा घोडेबाजार; शिवसेनेचा वार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsen NCP and Congress leaders meet governor Bhagatsingh Koshiyari