चुन चुनके मारेंगे; गायकवाडांच्या धमकीनंतर दानवेंचे आव्हान, म्हणाले...

sanjay gaikwad ambadas danve
sanjay gaikwad ambadas danveSakal

मुंबई : "मुंबईचं महत्त्व कसे कमी करता येईल, मुंबईवर बेगडी प्रेम दाखवयचं, मुंबईतील अनेक कार्यालये, उद्योग गुजरातला दिल्लीला हलवायचे प्रयत्न चालू आहेत. मराठा माणसावरचं प्रेम करून अहमदाबादचं महत्त्व वाढवायचा खेळ सध्या सुरू आहे पण महाराष्ट्राने हे सातत्याने सोसलं आहे. यावरही महाराष्ट्र मात करेल." असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर केला आहे. त्याचबरोबर संजय गायकवाड यांनी चुन चुनके मारेंगे या धमकीवरही प्रत्युत्तर देताना आव्हान केलं आहे.

(Ambadas Danve on Sanjay Gaikwad)

दरम्यान, विधानपरिषदेवर राज्यापालांकडून निवडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने दिलेली १२ आमदारांची यादी राज्यपालांनी रद्द केली असून नव्या सरकारच्या काळात राज्यपाल तत्पर झाले आहेत. ज्या निर्णयासाठी दोन-तीन वर्ष आम्ही पाठपुरावा केला ते निर्णय दोन-तीन मिनीटांत राज्यपालांकडून घेण्यात येत आहेत. अशा शब्दांत दानवेंनी राज्यपालांवर खोचक टोला लावला आहे.

sanjay gaikwad ambadas danve
'दसरा मेळावा आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार'; सामनातून हल्लाबोल

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहित आम्ही शिवसेनेला पेंग्विनसेना का म्हणू नये असा टोला लावला होता. त्याला दानवेंनी प्रत्युत्तर दिले असून शिवसेना ही पेंग्विन सेना आहे की दुसरी कोणती सेना आहे ते निवडणुकीच्या मैदानात कळेल असं आव्हान दानवे यांनी केलं आहे.

बुलढाण्यात दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठी हाणामारी झाली होती. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी "शिंदे यांच्या विरोधात बोलाल तर चुन चुन के मारंगे, गिन गिनके मारेंगे" अशी धमकी दिली होती. त्यांच्या या धमकीवर उत्तर देताना शिवसेनेचे अंबादास दानवे म्हणाले की, "शिवसेनेला चुन चुनके मारण्यासाठी अजून जन्माला यायचा आहे. संजय गायकवाड याच्यामध्ये हिंमत असेल तर त्याने भ्याडपणे न थांबता समोर यावं, मग चुनतं कोण आणि गिनतं कोण हे कळेल." असं आव्हान दानवे यांनी आमदार गायकवाड यांना केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com