
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी चर्चेत आले होते. आमदार निवासातील कँटिन कर्मचाऱ्याला जेवणावरून त्यांनी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. यानंतर संजय गायकवाड नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जोरदार चर्चा सुरूय. बुलढाण्यात चिखलीत झालेल्या शिंदे गटाच्या संवाद मेळाव्याचा बॅनर आता व्हायरल होत आहे. पक्षाचा मेळावा असूनही या बॅनरवर संजय गायकवाड आणि त्यांच्या मुलाचाच फोटो आहे. पक्षाचं नाव, चिन्ह किंवा एकनाथ शिंदे यांचाही फोटो बॅनरवर नसल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.