esakal | दयावान राज्यपालांनी 48 तासांऐवजी दिले सहा महिने : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

दयावान राज्यपालांनी 48 तासांऐवजी दिले सहा महिने : उद्धव ठाकरे

वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. आता सहा महिने आम्हाला मिळाले आहेत. भाजप-मेहबुबा मुफ्ती, भाजप-नितीश कुमार कसे एकत्र आले याचा प्रस्ताव मागविला आहे. मग, आम्ही ठरवू. त्यानंतर तुमच्यासमोर येऊ. त्यांनी आता मित्र म्हणून आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत.

दयावान राज्यपालांनी 48 तासांऐवजी दिले सहा महिने : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : त्यांनी मला खोटं ठरवून खोटं बनविण्याचा प्रयत्न केला. या राज्यपालांसारखे दयावान राज्यपाल लाभले नाहीत. त्यांनी 48 तासांऐवजी आम्हाला सहा महिने दिले. आम्ही बसून सर्व प्रस्तावांवर चर्चा करू आणि आमचा दावा पुढे नेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेनेकडून सोमवारीच अधिकृत प्रस्ताव आलेला आहे. त्यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितलेला आहे. यावर आमची चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. असे स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल राष्ट्रवादी आणि कॉंग्रसचं 'हे' ठरलं

उद्धव ठाकरे म्हणाले, की आपल्यासमोर येण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पत्रकार परिषद पाहिली. रविवारी मी आमदारांना भेटण्यासाठी आलो होते. सोमवारी सायंकाळपर्यंत भाजपची मुदत संपली. त्यांची मुदत संपण्यापूर्वीच आम्हाला मुदत देण्यात आली. आम्हाला फक्त 24 तासांची वेळ देण्यात आली. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्याचे सांगण्यात आले. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत काल पहिल्यांदा संपर्क केला. राज्यपालांना भेटून आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला होता. पण, महाराष्ट्राचे सरकार स्थापन करण्यासाठी पोरखेळ नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी आम्हालाही स्पष्टता हवी होती. त्यासाठी आम्ही 48 तासांची मुदत मागितली होती. 

काँग्रेसला निमंत्रण न देणं हे चुकीचं : अहमद पटेल 

वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. आता सहा महिने आम्हाला मिळाले आहेत. भाजप-मेहबुबा मुफ्ती, भाजप-नितीश कुमार कसे एकत्र आले याचा प्रस्ताव मागविला आहे. मग, आम्ही ठरवू. त्यानंतर तुमच्यासमोर येऊ. त्यांनी आता मित्र म्हणून आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला- शरद पवार

loading image