शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही - अमोल मिटकरी

शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर मिटकरी यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
NCP amol mitjari on eknath shinde as a next chief minister of maharashtra and devendra fadanvis
NCP amol mitjari on eknath shinde as a next chief minister of maharashtra and devendra fadanvis

मुंबई : शिवसेनेत बंडखोर शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनिकरणाशिवाय पर्याय नाही, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यांवरुन मिटकरी यांनी याबाबत ट्विट केलं आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला होता. (ShivSena Eknath Shinde group has not any option to merge with BJP says Amol Mitkari)

मिटकरी ट्विटमध्ये म्हणतात, "शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असं चित्र सध्याच्या घडामोडींवरून निर्माण झालं आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीसांचा दिल्लीदौरा अचानक रद्द होणं आणि एकनाथ शिंदेंच एकटेच दिल्लीला जाणं? यावरुन महाराष्ट्रात लवकरच महाभारत होणार असल्याची चिन्हं आहेत"

NCP amol mitjari on eknath shinde as a next chief minister of maharashtra and devendra fadanvis
ईडीची उडाली झोप! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातही सापडलं घबाड

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी दिल्ली दौरा नियोजित होता. याआधी एकनाथ शिंदे ५ वेळा दिल्लीला जावून आले आहेत. आजचा त्यांचा सहावा दिल्ली दौरा होता. आता शिंदे उद्या दिल्लीला जावू शकतात असं सांगण्यात आलं आहे. मुंबईतील पूर्वनियोजित बैठकांमुळे हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे.

NCP amol mitjari on eknath shinde as a next chief minister of maharashtra and devendra fadanvis
'प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार...' सेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्यावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खोचक टीका केली होती. अजित पवार म्हणाले होते की, काँग्रेस सरकारच्या काळात सर्व निर्णय दिल्लीत व्हायचे. भाजप सरकारचे देखील निर्णय दिल्लीत होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णय मुंबईत होतात. शरद पवार मुंबईत असतात. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाच्या वेळी मुंबईत निर्णय व्हायचे. ममता बॅनर्जी यांचे निर्णय कोलकात्याला होतात. पक्ष कोणता आहे हे महत्त्वाचं आहे. आता शिंदे यांचे निर्णय दिल्लीत होतात, त्याला आपण काय करणार असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com