हे आपलं आणि सर्वसामान्यांचे सरकार : एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

जनतेच्या मनात ज्या काही शंका होत्या त्या संपुष्टात आल्या आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून महाविकासआघाडी सरकार स्थापन करत आहे. शिवतीर्थावर ऐतिहासिक सोहळा होत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या साक्षीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार हे आपले सरकार असून, सर्वसामान्यांचे असेल. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पाऊले उचलणार आहोत, असे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकासआघाडीच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. राज्यातील जनतेला किमान समान कार्यक्रम काय आहे, हे माहिती जाणून घेण्याची जनतेला उत्सुकता होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

मी आज शपथ घेणार नाही : अजित पवार

एकनाथ शिंदे म्हणाले, की जनतेच्या मनात ज्या काही शंका होत्या त्या संपुष्टात आल्या आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून महाविकासआघाडी सरकार स्थापन करत आहे. शिवतीर्थावर ऐतिहासिक सोहळा होत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या साक्षीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनविण्यात आला आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गाने पुढे नेऊन महाविकासआघाडीचे निर्णय सर्व घटकांसाठी समान असणार आहेत. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघुउद्योजक, नोकरदार या सर्व घटकांचा विचार केलेला आहे. सर्वसामान्यांचे आणि आपलं सरकार हे असणार आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल. 

राज्यात आजपासून उद्धव सरकार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Eknath Shinde talked about Common minimum Programme