नगर पोलिसांनी आता कारवाई करावी : नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. भटक्या विमुक्त जाती संबंधित नागरिक ज्यांना जमीन नाही, त्यांना जगण्यासाठी गावोगावी फिरावे लागते. अशाच काही कुटुंबातील गुरे आणि शेळी इतरांच्या शेतात गेल्याने कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे.

मुंबई : गावात ग्रामरक्षक दल असते तर नगरमधील आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाणा केल्याचा प्रकार टाळता आला असता. नगरच्या पोलिसांनी या घटनेमध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे. नगर पोलिसांवर यापूर्वीही आरोप झालेले आहेत. भटक्या विमुक्तांसाठी टास्क फोर्स निर्माण करून महिलांसाठी स्वतंत्र विभाग केला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

याबाबत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, की नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. भटक्या विमुक्त जाती संबंधित नागरिक ज्यांना जमीन नाही, त्यांना जगण्यासाठी गावोगावी फिरावे लागते. अशाच काही कुटुंबातील गुरे आणि शेळी इतरांच्या शेतात गेल्याने कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे. समाजात एकोपा कसा राहिल आणि या घटना टाळल्या कशा जातील यासाठी काम केले पाहिजे.

संबंधित बातम्या :
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)
महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना धक्कादायक : चित्रा वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena leader Neelam Gorhe talked about Nagar incident and police