MH Political Crises : कोर्टाच्या निर्णयावर राऊतांचं तीन शब्दांत उत्तर; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

MH Political Crises : कोर्टाच्या निर्णयावर राऊतांचं तीन शब्दांत उत्तर; म्हणाले...

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. या सर्वामध्ये न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर न देता निघून गेले आहेत. यावेळी राऊतांनी केवळ ही कायदेशीर लढाई आहे ती चालत राहिल असे मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे. (Sanjay Raut Comment On Supreme Court Result )

हेही वाचा: बंडखोरांसाठी मिटकरींचे ट्वीट; "एकादशी" तिकडे अन्...

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच या नोटीशीला पाच दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. तर, नोटीस बजावलेल्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. (Maharashtra Political Crises Latest News In Marathi) विशेष म्हणजे न्यायालयाने यावेळी महाराष्ट्र सरकारला 39 आमदार, त्यांचे कुटुंबीय व मालमत्तांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: 'गद्दारांना माफी नाही' सेनेबरोबर गद्दारी करणाऱ्या नगरसेवकाचं काय झालं?

शिवसेनेच्या मागणीनंतर उपसभापतींनी एकनाथ शिंदे आणि अन्य 15 बंडखोर आमदारांना नोटीस बजावून 27 जून संध्याकाळपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच या सर्व बंडखोर आमदारांचे निलंबन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 15 आमदारांनी या नोटीसबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने बंडखोर आमदारांना नोटीशीला उत्तर देण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी 12 जुलैपर्यंतीची वेळ दिली आहे. तसेच तो पर्यंत संबंधित बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: बोलण्यासारख काही नसल्यानं देवेंद्र फडणवीसांचं मौन

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील पुढील सुनावणी या सर्व घडामोडींमध्ये आज संध्याकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून, या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार की एखादा महत्त्वाचा निर्णयाची घोषणा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे गुवाहाटी येथे गेलेल्या एकनाथ शिंदेंच्या गटाचीदेखील बैठक सुरू झाली असून, या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो तसेच या पुढील लढाईची रणनीती नेमकी कशी असेल यावर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Web Title: Shivsena Leader Sanjay Raut Comment On Supreme Court Result On Maharashtra Political Crises

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..