आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सुजवून पाठवू : अब्दुल सत्तार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सुजवून फुगवून पाठवू, अशा प्रकारचा इशाराच शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

मुंबई : राजकीय घडामोडींवर लक्ष आम्ही लक्ष ठेऊन आहोत. दोन दिवसांत आमची सत्ता स्थापन होईल. आमदार फोडले तर आम्ही रुग्णालयात पाच रुम बूक केल्या आहेत. आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सुजवून फुगवून पाठवू, अशा प्रकारचा इशाराच शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, केणताही आमदार आता फुटणार नाही. जर एखादा आमदार फुटला तर, त्याच्यासाठी अँम्ब्युलन्स आणि रुग्णालयात बुकींग केली आहे. असेही ते म्हणाले. 

आता वेळ जवळ आली, आज पवारांना भेटणार : संजय राऊत

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा कोणताही आमदार फुटणार नाही, तसेच काॅग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार देखील फुटणार नाहीत. उदयनराजेंची काय स्थिती झाली सगळ्यांनी पाहिली आहे. सहकारमंत्री चुकीने म्हणाले की, भाजपशिवाय सरकार बनू शकत नाही, खरं तर त्यांच्या शिवायही सरकार बनू शकतं. शिवसेनाच सरकार स्थापन करणार आहे यात काही वाद नाही.

संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MLA Abdul Sattar criticize bjp