PM Narendra Modi: ‘नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेणार’; शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य

PM Narendra Modi: शिवसेनेचे हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे कायमच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiEsakal

राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट किंवा ठाकरे गट यापैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. त्यानंतर शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंनद, जल्लोष साजरा केला जात आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे.

आमदार संतोष बांगर म्हणाले, 'प्रत्येकाला माहिती आहे की, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीलाच आपल्याला निवडुन द्यायचं आहे. छाती ठोकून सांगतो. २०२४ चा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. एप्रिलमध्ये आगामी लोकसभेची निवडणूक आहे. छाती ठोकून सांगतो, २०२४ ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भर चौकात फाशी घेईन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील', असंही संतोष बांगर म्हणाले.

PM Narendra Modi
Uddhav Thackeray : ठाकरेंच्या अडचणी थांबेनात! शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर आता 'मशाल'ही जाणार?

शिंदेंच्या १६ आमदारांना अपात्र करता येणार नाही, नार्वेकरांनी फेटाळली याचिका

विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या १६ आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे शिंदे गटातील आमदार पात्र ठरले आहेत.

ठाकरे गटाचे १४ आमदारही पात्र! विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

ठाकरे गटाचे १४ आमदार देखील पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे. यामुळे या प्रकरणातील शिंदे आणि ठाकरे गटाचे मिळून सर्व ४० आमदार पात्र ठरले आहेत. एकमेकांना अपात्र करण्याच्या दोन्ही गटांच्या याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या आहेत.

PM Narendra Modi
Shiv Sena MLA Disqualification Case: "तर ठाकरे गटाचे १४ आमदारही अपात्र ठरवले असते"; शिवसेना मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com