शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना कोरोनाची लागण

अरविंद सावंत
अरविंद सावंतsakal

राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरिअंटने चिंता वाढवली असताना निर्बंध लागू करण्याची तयारीसुद्धा सुरु आहे. दरम्यान, गेल्या आठवड्याभरात राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता शिवसेना (Shivsena) खासदार अरविंद सावंत (Arvind sawant) यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

अरविंद सावंत यांनी म्हटलं की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करा आणि काळजी घ्या असं आवाहनही खासदार सावंत यांनी केलं.

अरविंद सावंत
केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन लावावं लागेल - पेडणेकर

मंगळवारी सकाळपर्यंत राज्यातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय आमदार रोहित पवार, धीरज देशमुख यांनाही कोरोना झाल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली होती. त्याआधी भाजप आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नात उपस्थित लावलेल्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं बरीच चर्चा झाली. यात खासदार सुप्रिया सुळे, आमदार हर्षवर्धन पाटील, तसंच त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com