मनी लाँड्रिंग प्रकरण | शिवसेना खासदार भावना गवळींना ED कडून पुन्हा समन्स! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhawana gawali

मनी लाँड्रिंग प्रकरण | खासदार भावना गवळींना ED कडून पुन्हा समन्स!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : मनी लाँड्रिंग (money laundering case) प्रकरणी शिवसेना खासदार भावना गवळी (shivsena mp Bhawana Gawali) यांची सध्या ईडीकडून (ED) चौकशी सुरू आहे. आता पुन्हा ED कडून समन्स बजावण्यात आले आहे.

ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स

भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान (saeed khan) यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. २४ नोव्हेंबरला अर्थात बुधवारी भावना गवळी यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. भावना गवळींना सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

हेही वाचा: समीर वानखडेंना धक्का; आर्यन खान प्रकरणात NCB तपासावर प्रश्नचिन्ह

नेमकं प्रकरण काय?

वाशीम जिल्हय़ातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. “भावना गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. ७ जुलै २०१९ रोजीच्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. १० महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले?” असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार विभाग, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत

हेही वाचा: 'आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला'

loading image
go to top