esakal | उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट; पाच-सहा दिवसांत सरकार : संजय राऊत 
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut speaks about Government formation in today PC

राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आम्ही बहुमत घेऊन राज्यपालांकडे जाऊ व सत्तास्थापनेचा तिढा सोडवू. सत्तास्थापनेची प्रक्रिया पुढील पाच ते सहा दिवसांत पूर्ण होईल. उद्या दुपारपर्यंतच सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबर महिना उजाडण्याआधीच महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले असेल,' असा दावा राऊतांनी आज केला.  

उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट; पाच-सहा दिवसांत सरकार : संजय राऊत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : 'डिसेंबर महिना उजाडण्याआधीच महाराष्ट्रात सत्तास्थापन होईल. पाच ते सहा दिवसांत सरकार स्थापन झालेले असले. तर उद्या दुपारपर्यंतच सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झालेले असेल,' असे आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता तरी महाराष्ट्राला लवकरच मुख्यमंत्री मिळेल अशी आशा आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आम्ही बहुमत घेऊन राज्यपालांकडे जाऊ व सत्तास्थापनेचा तिढा सोडवू. सत्तास्थापनेची प्रक्रिया पुढील पाच ते सहा दिवसांत पूर्ण होईल. उद्या दुपारपर्यंतच सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबर महिना उजाडण्याआधीच महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले असेल,' असा दावा राऊतांनी आज केला.  

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान मोदींची भेट घेतील. या भेटीबाबत राऊतांना प्रश्न विचारले असता, ते म्हणाले की, 'मोदी पंतप्रधान आहेत, त्यांना कोणीही जाऊन भेटू शकते. पवार हे देशातील मोठे नेते आहेत. महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ते मोदींना भेटणार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी पवार मोदींची भेट घेतील' असे राऊतांनी यावेळी सांगितले.

शरद पवार-नरेंद्र मोदींची दिल्लीत होणार भेट; काय असेल?

शिवसेना भाजपसोबत जाणार का, अशा चर्चा सुरू आहेत, यावर माध्यमांनी राऊतांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, 'ज्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत नाही व राज्यात लवकर सत्तास्थापन व्हावी असे वाटत नाही असे लोक अशा अफवा पसरवतात' असे राऊतांनी यावेळी सांगितले. सत्तास्थापनेचा यज्ञ आता पूर्ण होणार, त्यात आहुती पडल्या आहेत. तसेच यज्ञात अनेक विघ्न आली ती आता दूर झाली आहेत. असे राऊतांनी यावेळी सांगितले. आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक झाल्यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले. 

राऊतांनी आज ट्विट केली अटलबिहारी वाजपेयींची कविता
संजय राऊत यांनी आज (बुधवार) पुन्हा एकदा आपला ट्विट कार्यक्रम सुरुच ठेवला असून, आज त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट केली आहे. संजय राऊत यांनी आज आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनो के विघ्नो ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नव दधीची हड्डिया गलाए, आओ फिर से दिया जलाए, अशी अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे. अपनो के विघ्नों ने घेरा असे म्हणत त्यांनी थेट भाजपा डिवचले आहे. तर, पुन्हा एकदा दिवा लावणार असेही याचा अर्थ होतो.

loading image
go to top