आमचे आमदार फुटणार नाहीत, कोणाची हिंमतही नाही : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

भाजप हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे, त्यांना आज जाऊन दावा करावा. 145 ज्यांच्याकडे आकडा आहे त्यांना बहुमताचा दावा करावा. शिवसेनेच्या आमदारांची आज उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत.

मुंबई : हरियाना, कर्नाटक, झारखंड येथे जे झाले हे आपल्या राजकारणाचे दुर्दैव आहे. पण, महाराष्ट्रात यंदा असे होणार नाही. कोणत्याही पक्षाचे आमदार फुटणार नाही, शिवसेनेचे आमदार तर शक्यच नाही. शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकण्याची हिंमत कोणाच्यात नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचं आज ठरणार; शिवसेनेच्या 'वाघां'ची मातोश्रीवर बैठक

मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची आज (गुरुवार) मातोश्रीवर बैठक होत आहे. शिवसेनेच्या आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजप शिवसेनेचे आमदार फोडण्याचे वृत्त आल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याचे खंडन केले. 

पुन्हा एकदा पवार राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी

संजय राऊत म्हणाले, की भाजप हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे, त्यांना आज जाऊन दावा करावा. 145 ज्यांच्याकडे आकडा आहे त्यांना बहुमताचा दावा करावा. शिवसेनेच्या आमदारांची आज उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची आणि शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल हे निश्चित आहे. भाजपने काय करावे हे त्यांनी ठरवावे. गोड बातमी काय आहे हे ठरवावे लागेल. एक दिवस ते गोड बातमी घेऊन येतील ही खात्री आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री हीच गोड बातमी असेल. फडणवीस यांच्याशी कोणतीही व्यक्तिगत लढाई नाही. शिवसेनेकडून कोणतीही अडमुठी भूमिका घेतलेली नाही. जे ठरलं तेच व्हावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut talked about party MLAs and government formation