
पैसा, पद आणि अतिचिंतेपासून सावध रहा, राऊतांचा खोचक टोमणा
राज्यात सत्ताधारी शिवसेनेमध्ये (Shivsena) दोन गट पडले असून त्यावरुन प्रचंड घमासान माजलंय. एकीकडे शिंदे (Eknath Shinde) गटाकडून बंड पुकारण्यात आलं. शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. तर दुसरीकडे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर हल्लाबोल करत सेनेत पुन्हा येण्याचे दरवाजे बंद केले आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पैसा, पद आणि अतिचिंतेपासून सावध रहा असे ट्विट करत एकनाथ शिंदेंसह सोबतीच्या आमदारांना खोचक टोमणा (shivsena mp sanjay raut tweet on maharashtra political crisis)लगावला आहे.
हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: शिंदे गट मविआचा पाठिंबा काढणार? राज्यपालांना देणार पत्र
रुदयाई क्लिपिंग यांचे सूचक विधान शेअर करत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोमणा मारला आहे. ''पैसा किंवा पद किंवा वैभव यांच्या अतिचिंतेपासून सावध रहा. यापैकी कशाचीही पर्वा न करणारा माणूस तुम्हाला कधीतरी भेटेल.. तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती गरीब आहात.'' असे या ट्विट मध्ये म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचा गट आज राज्यपालांना (Bhagat Singh Koshyari) पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गट हीच शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा राज्यपालांकडे देणाऱ्या पत्रात केला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचा: 'भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला...'सेनेचा हल्लाबोल
तर दुसरीकडे पक्षाच्या नेते पदावरुन शिंदे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे यांच्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. आज दुपारी १ वाजता शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकरिणी बैठक आहे. पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.
Web Title: Shivsena Mp Sanjay Raut Tweet On Maharashtra Political Crisis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..