esakal | मातोश्रीचा निरोप घेऊन संजय राऊत दिल्लीला जाणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut will meet Sonia Gandhi after Uddhav Thackeray meeting

सत्तास्थापनेची सूत्रे सगळ्याच बाजूने हाललेली असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख उद्धाव ठाकरे यांची भेट घेतील. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊत दिल्लीला सोनिया गांधींची भेट घेतील अशी शक्यता आहे.

मातोश्रीचा निरोप घेऊन संजय राऊत दिल्लीला जाणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सत्तास्थापनेची सूत्रे सगळ्याच बाजूने हाललेली असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख उद्धाव ठाकरे यांची भेट घेतील. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊत दिल्लीला सोनिया गांधींची भेट घेतील अशी शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुबंईत शरद पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, तर दिल्लीत सोनिया गांधींची काँग्रेसच्या नेत्यांसह चर्चा सुरू आहे. 

भाजपच्या अहंकार, खोटारडेपणामुळेच राज्यावर ही वेळ : संजय राऊत 

संजय राऊत व उद्धव ठाकरे भेटीत शिवसेना सत्तास्थापनेसाठी आज राज्यपालांकडून अधिक वेळ मागून घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एनडीएमधून बाहेर पडण्यासाठीही शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आज सोनिया गांधींची भेट घेतील. 

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

आज आपण केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद सावंत यांनी जाहीर केले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेना एनडीएमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राऊत आज दुपारी नवी दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर या हालचाली होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. तर मुंबई वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक सुरु आहे.  

'100 दाऊद, एक राऊत' अजूनही हीच मर्दाची ओळख

loading image