शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे पुढच्या निवडणुका एकत्रित लढवल्या जाणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 24 July 2020

विधानसभेतील बेरीज फायद्याची
विद्यमान विधानसभेत शिवसेनेने राष्ट्रवादीचे उमेदवार ठिकाणी २९ पाडले आहेत, तर राष्ट्रवादीने ५४ जागा जिंकताना २८ ठिकाणी शिवसेनेला पाडले आहे. या जागांची एकत्र बेरीज केली तर आजच ५७ विधानसभा जागांचा दोन्ही पक्षांना फायदा आहे. हा प्रयोग यशस्वी होणार काय? यावर पुढचे राजकारण अवलंबून असेल.

मुंबई - महाराष्ट्रात यापुढे नव्या राजकीय अध्यायाला प्रारंभ होणार असून, या पुढच्या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे एकत्रित लढवल्या जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारभार हाकताना आता एकत्र येण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोन्ही नेत्यांनी रायगड जिल्ह्याबाबत एकीचा प्रयोग सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अजित पवार यांचे खास सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या प्रोजेक्‍टची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 

केजी ते दुसरी ऑनलाईन शिक्षण; नववीपासून बारावीपर्यंत चार तासिकांची शाळा 

या जिल्ह्यातील शिवसेना आमदार भारत गोगावले, जितेंद्र थोरवे, जितेंद्र दळवी, तर राष्ट्रवादीच्या आमदार पालकमंत्री अदिती तटकरे, अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत ज्याने त्याने आपापल्या मतदारसंघातील कारभार पाहावा, नियुक्ती, निधी यात हस्तक्षेप करू नये, असे ठरले. हाच प्रयोग संपूर्ण राज्यात राबवायची शिवसेनेची इच्छा आहे. 

विधानसभेतील बेरीज फायद्याची
विद्यमान विधानसभेत शिवसेनेने राष्ट्रवादीचे उमेदवार ठिकाणी २९ पाडले आहेत, तर राष्ट्रवादीने ५४ जागा जिंकताना २८ ठिकाणी शिवसेनेला पाडले आहे. या जागांची एकत्र बेरीज केली तर आजच ५७ विधानसभा जागांचा दोन्ही पक्षांना फायदा आहे. हा प्रयोग यशस्वी होणार काय? यावर पुढचे राजकारण अवलंबून असेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena NCP Congress will contest the next elections together