शिवसैनिक आक्रमक, सोमय्यांचा प्रतिकात्मक पुतळा दाखल केला मेन्टल हाॅस्पिटलमध्ये

शिवसैनिकांनी सोमय्या यांचा पुतळा डॉक्टरांकडे सुपूर्द केला.
sangli
sangliEsakal

सांगली : भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि ब्लॅकमेलर टोळीवर विक्रांत युद्ध नौकेच्या नावावर निधी गोळा करुन तो गडप केल्याचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने (Shivsena) सांगलीतील स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी किरीट सोमय्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून तो मिरजेच्या (Miraj) कृपामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला. तर शिवसैनिकांनी सोमय्या यांचा पुतळा डॉक्टरांकडे सुपूर्द केला. कृपामाई हे मेन्टल हॉस्पिटल म्हणून प्रसिध्द आहे.

१९७१ च्या युद्धात अतुलनीय पराक्रम करणाऱ्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेच्या जतन आणि संवर्धनासाठी लोकवर्गणी गोळा करण्याचे नाटक करून भाजपचे ब्लॅकमेलर पदाधिकारी किरीट सोमय्या आणि त्याच्या टोळीने सुमारे दहा वर्षांपूर्वी जनतेकडून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला होता. ही रक्कम ५८ कोटी रूपयांच्या घरात असल्याचे समजते. राज्यपालांकडे रक्कम सुपूर्द करणार आहोत असे सांगून त्याने पैसे गोळा केले होते. परंतू राजभवनाकडे अशाप्रकारे कोणत्याही रकमेचा भरणा झालेला नाही. याचाच अर्थ सोमय्या आणि त्याच्या टोळीने ही रक्कम हडप केली आहे. ही रक्कम सोमय्या यांनी आपल्या निल नावाच्या मुलाचे करियर घडवण्यासाठी मोठ्या बांधकाम प्रकल्‍पात गुंतवली असल्याचे समजले आहे.

sangli
राऊत मुंबईत दाखल होताच भाजप नेत्यांचे टीकास्त्र; म्हणाले,‘गजा मारणे'चही...

रक्कम हडप केली आणि कुठे गुंतवली हे अद्याप ईडी सारख्या संस्थेला सुद्धा समजून आलेले नाही. या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून चौकशी करणे हे कर्तव्य समजून तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घ्यावा. हडप केलेली ५८ कोटीची रक्कम जप्त करून शासन सहाय्यता निधीत जमा करावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.

sangli
...अन्यथा आगामी निवडणुकीत ओबीसी नेतृत्व तयार होणार नाही- पडळकर

शहर पोलीस निरीक्षक अजय शिदकर यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, चंदन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महादेव मगदूम, विशालसिंग राजपूत, हरिदास लेंगरे, मयूर घोडके, हेमाताई कदम, सुनिता पाटील, मनीषा पाटील, रुपेश मोकाशी, नितीन काळे, राम काळे, किशोर पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com