Shivsena Row : EC, ED अन् CBI नंतर भाजपचं पुढचं लक्ष...; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

चिन्ह आणि पक्षाचं नाव गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.
ShivSena Party Symbol Row
ShivSena Party Symbol RowSakal

Shivsena Row : पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव गेल्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोग. शिंदे गटासह भाजपवर उद्धव ठाकरेंसह अन्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल करण्यास सुरू केला आहे.

ShivSena Party Symbol Row
Shivsena Row : उद्धव ठाकरेंचं बाळासाहेबांच्या पावलावर पाउलं; ओपनकारमध्ये केलं कार्यकर्त्यांना संबोधित

निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरू झाली असून, या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

ShivSena Party Symbol Row
Elon Musk : 'पेड ब्लू टिक' नंतर मस्कचा यूजर्सना आणखी एक झटका; 'या' सेवेसाठी द्यावे लागणार पैसे

निवडणूक आयोग लोकशाही आणि कायद्याच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी स्थापन केली आहे. मात्र, ही संस्था एका राजकीय पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची बाजू घेत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत आहे. निवडणूक आयोग ही पूर्णपणे तडजोड करणारी संस्था असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला.

ShivSena Party Symbol Row
Smartphone Charge With Urine : आला नवा रँचो, मुत्रविसर्जनातून करणार मोबाईल चार्ज

चतुर्वेदी म्हणाल्या की, भाजपने आधीच EC, ED आणि CBI या संस्थांना त्यांचे निवडणूक टूलकिट बनवले आहे आणि आता त्यांचे पुढील लक्ष्य न्यायव्यवस्था आहे.

कायदामंत्री आणि राज्यसभेचे सभापती न्यायव्यवस्थेला आव्हान देत आहेत. त्यामुळे लोकशाहीचे रक्षण करणे ही सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये स्थापन केलेल्या पक्षावर ठाकरे कुटुंबीयांचे नियंत्रण जाणे ही पहिलीच वेळ आहे. निवडणूक आयोगाने निर्णय घेताना विधिमंडळातील पक्षाची ताकद लक्षात घेतली. यामध्ये मुख्यमंत्र्यांना ५५ पैकी ४० आणि १८ पैकी १३ आमदारांचा पाठिंबा असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com